शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. त्यांचे सुपूत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने छापेमारी कारवाई सुरु असून मात्र या छापेमारीमगच कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ईडीने ताब्यात घेतले आहे.
विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप – प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
मात्र ईडीच्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ईडीच्या या कारवाईवर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली होती. ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
Read Aslo –
मुंबई महापालिका निवडणूक: भाजप मनसेसोबत जाणार? फडणवीस म्हणाले….
आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचे छापे
गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, सावंतांचा सवाल