“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या NOC गरज लागणार नाही”, अशी खोचक टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
प्रविण दरेकर म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पहले मंदिर फिर सरकार पण आधी ते सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होत आहे. तसेच शरद पवार यांची जी भूमिका आहे तशीच भूमिका ते सुद्धा घेतील अस मला वाटत नाही. हिंदुत्व आणि राम मंदिरच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे कशाची पर्वा करणार नाही आणि शरद पवार यांच्या एनओसीची वाट पाहणार नाही”, असंही दरेकर यांनी सांगितले.
“सरकार चालवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. पण त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यावे”, असंही दरेकरांनी सांगितले.