स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे”, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेता येणार नाही. राज्य सरकारकडून याबाबत जीआर जारी करण्यात आला आहे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
कोरोना संकटाच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करत अधिकाऱ्यांच्यासोबत बैठका घेऊन माहिती घेतली. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बंधने घालण्यात आली आहेत.
“विरोधी पक्षनेत्यांनी कुठे जाऊ नये आणि माहिती घेऊच नये, असा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यामातून केला आहे. पण कोबंडं झाकलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही”, अशी टीका दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, राज्य सरकारने आणि सरकारमधील पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजनाची, बैठकीची आवश्यकता होती. पण फक्त कोरोनाला घाबरुन अशा प्रकारचे नियोजन केले नाही.