IMPIMP

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे गेल्या 10 वर्षांतील संपत्तीच्या विवरणाची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षातील संपत्तीचे वितरण द्या. त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असे आयकर विभागाने यात नोटीसमध्ये म्हटलं आहे. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग आहे. या नोटीसला सविस्तर उत्तर देण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.

काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. चव्हाण यांनी याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, हे भाजपला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते.