कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. एका खासगी कार्यक्रमाला जात असताना रस्त्यात अपघात घडल्याचे कळताच पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला ताफा थांबवत मदतीला धावून जाताना दिसले.
इतकेच नव्हे तर त्यांनी अपघातातील जखमींना त्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना दवाखान्यात हलवले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत वृत्ताला दुजोरा दिला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुक पोस्टमध्ये या घटनेबाबत लिहले कि, ‘आज एका लग्न समारंभाला जाताना कराड येथे सैदापुर कॅनाल येथे अपघात झाला. त्याच वेळी माझा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.अपघात पाहून गाड्यांचा ताफा थांबवला. गाडीतून खाली उतरत प्रथम जखमींची चौकशी केली.
अपघातातील महिला अतिशय घाबरलेली होती, प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. आणि तेथिल अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पीटल मध्ये नेण्याच्या सुचना केल्या.व ताफ्यातील गाडीतून जखमींना दवाखान्यात हलवले’
Read Also
वीज बिल प्रकरणात मनसे आक्रमक, राज ठाकरेंनी दिला महत्वाचा आदेश