मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.
या मुलाखतीमध्ये नेमके काय असणार, मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. 44 सेकंदांचा हा प्रोमो आहे.
कसं वाटतं आपल्याला?…मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? तुमच्या जिवनात वर्षभरात काय बदल झाले? असे प्रश्न या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहेत.