पुणे : राज्यभरात सलग दुसऱ्या वर्षीदेखील गणेशोत्सव महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाहीये. त्यामुळे, यावर्षीही देखावे तयार न करता गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने करावा, भाविकांना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत, अनेक विषयांवर जनजागृती करावी, आरोग्य सेतु ऍप वापरण्यास प्राधान्य देऊन, आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यायला पुणेकरांना सांगावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार; वाचा महापालिका प्रशासनाची नवी नियमावली…
तसेच, राज्य सरकार, पुणे महापालिकेच्या नियमांचे पालन करतानाच पुणे पोलिसांनी, गणेशोत्सवासाठी आचारसंहीता तयार केली असून, त्याचे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्याचे त्यांनी नागरीकांना आवाहन केले आहे. त्यासाठी महापालिकेकडून गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली गेली होती. त्यात पोलिसांकडून ही आचारसंहिता जाहीर केली गेली.
काय आहे आचारसंहिता?
- गणेश मुर्ती खरेदी मंडळांनी व नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनेच करावी. त्यासाठी शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर मुर्ती विक्रीची व्यवस्था करावी.
- श्रींचे आगमन व विसर्जनासाठी मिरवणुक काढू नये. तसेच, आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी व्यक्ती एकत्र येतील याची दक्षता घ्यावी.
- गणेश प्राण प्रतिष्ठापनेसाठी मंदिरे असलेल्या मंडळांनी मंदिरातच प्रतिष्ठापना करावी व मंदिरे नसणाऱ्यांसाठी महापालिकेच्या नियमानुसार छोट्या मंडपात परवानगी घेऊन प्रतिष्ठापना करावी.
- पुजा व धार्मिक विधीसाठी ५ व्यक्ती हजर असतील. गर्दी होईल असे उपक्रम टाळावेत
- गणेश दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट किंवा फेसबुकद्वारे करावी. दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास सुविधा, वेळेची मर्यादा ठेवावी.
- सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. निमंत्रित व अतिमहत्वाच्या व्यक्तींना दर्शनाला परवानगी देऊ नये.
- सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य उपक्रम राबवावे.
- आग प्रतिबंधक उपाययोजना, संशयास्पद वस्तुबांबत सजगता बाळगणे. मुर्तीच्या अंगावरच्या मौल्यवान दागिन्यांच्या संरक्षणाची मंडळांनी विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी ५ कार्यकर्ते किंवा खासगी सुरक्षा रक्षक २४ तास तैनात ठेवावेत.
- गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आरोग्य सेतु ऍप वापरणे बंधनकारक. सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.
- मुर्तीचे विसर्जन मंडळांनी मंडपालगतच्या कृत्रीम हौदात करावे किंवा फिरत्या हौदाचा वापर करावा. विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक घाट, नदी, नाल्यावर विसर्जनास मनाई. महापालिकेकडून हौदांची पर्यायी व्यवस्था. मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रमास मनाई.
- घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन घरीच करावे. अपवादात्मक परिस्थतीत सोसायटीतील कृत्रीम हौदात घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करावे.
Read Also :
- बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात – उद्धव ठाकरे
- इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान
- प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रंगली जुगलबंदी; परळीतील कार्यक्रमात एकमेकांना काढले चिमटे
- ईडीच्या चौकशीला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर, ईडीला पत्र पाठवून सांगितले कारण
- मंदिरं दीर्घकाळापासून बंद, अण्णा इतके दिवस कुठं झोपले होते? राज ठाकरेंची चपराक