जयपूर : देशात कोरोना व्हायरसमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, दररोज 3 लाखांपेक्षा नवीन रुग्ण सापडत आहे. राजकीय नेते देखील या व्हायरसच्या विळख्यात अडकत चालले आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
अशोक गहलोत यांनी स्वतः ट्विट करत कोरोना लागण झाल्याची माहिती दिली. कोरोना टेस्ट केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नसून मी व्यवस्थित आहे. कोव्हिड नियमांचे पालन करत आयसोलेशनमध्ये राहत काम करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
कोविड टेस्ट करवाने पर आज मेरी रिपोर्ट भी पॉजिटिव आई है। मुझे किसी तरह के लक्षण नहीं हैं और मैं ठीक महसूस कर रहा हूं। कोविड प्रोटोकॉल का पालन करते हुए मैं आइसोलेशन में रहकर ही कार्य जारी रखूंगा।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) April 29, 2021
कालच गहलोत यांनी त्यांच्या पत्नी सुनिता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्यावर देखील होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मागील 24 तासात देशभरात 3 लाख 79 हजार नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. तर 3645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 69 हजार रुग्ण बरे देखील झाले आहेत.