पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. भूमिपूजनाचा आनंदोत्सव महाराष्ट्रातही पाहायला मिळाला. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून हा सोहळा साजरा केला. तर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क भजन गायल्याचं पाहायला मिळालं.
राम मंदिराच्या भूमिपूनजनाच्या निमित्तानं देशात उत्साहाचं वातावरण होतं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयात भजन गायलं.
जागो तो एक बार हिन्दू जागो तो…
यह वही समूहगान था जो हम अयोध्या में आन्दोलन के समय गाया करते थे। आज उन्ही यादों को उजागर किया ।
।। जय श्रीराम ।।#JaiShreeRam#पधारो_राम_अयोध्या_धाम#RamMandirAyodhya pic.twitter.com/fzXWP4DCoL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 5, 2020