धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात सध्या आरोप-प्रत्यारोपांवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. प्रेरणा ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमधील रूग्णांच्या उपचारावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे. यावरूनच आता राणाजगजितसिंह पाटील यांनी निंबाळकरांना मोठं आवाहन दिलंय.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपला उखडलं, कॉंग्रेसने जाहीर केली मोठी आकडेवारी
धाराशिवला १९९३ साली मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं. असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यावर याठिकाणी मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं, असं काही झालं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा. हे सिद्ध केलं तर मी राजकारण कायमचं सोडून देतो. निंबाळकर हा खोटारडा असून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत.
दरम्यान, याच मेडिकल कॉलेजमध्ये भाजपच्या काळात 2012 मध्ये 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या. तर 2016 मध्ये 16 लोकांवर 138 शस्त्रक्रिया झाल्या. तसेच 2014 मध्ये 9 रुग्णांवर 80 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. असा आरोप धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माहाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता.
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला भरणार उमेदवार अर्ज, तर २९ तारखेला मोदींचा रोड शो अन् जाहीर सभा
त्यावर एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा आहे. अनेक ‘शस्त्रक्रिया’ नाही तर अनेकदा ‘उपचार’ झाले आहेत. एकतर त्याला काही कळत नसेल किंवा पुन्हा खोटं बोलत असेल, अशा शब्दात भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
पुढे बोलतांना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, आपण शस्त्रक्रिया असा शब्द वापरत नाही तर उपचार असा शब्द वापरतो. समजा मी किडनीचा पेशंट आहे तर मला आठवड्याला डायलिसिस करावं लागतं. जर माझ्यावर दहा वेळा डायलसीस झाले तर माझ्यावर दहावेळा शस्त्रक्रिया झाली असं म्हणायचं का? ओमराजे यांना यातलं काही कळत नाही, किंवा खोटं बोलतोय, अशी टीका राणा जगजितसिंह पाटील यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“बारामतीसाठी शेवटचे सात दिवस राखून ठेवा”, अजितदादांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या सूचना
हेही वाचा…“पहिल्या टप्प्यात भाजपची सर्वत्र पिछेहाट, त्यामुळेच भाजपा निवडणुकीत बावचळली”
हेही वाचा…”भोसरी मतदारसंघातून एक लाखाच्यावर लीड देणार”
हेही वाचा…” ‘गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा,”पुण्यात कॉंग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
हेही वाचा….‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ नानासाहेब नवलेंचे सुनेत्रा पवार यांना प्रशस्तीपत्रक