पुणे : पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मोहोळ आपला उमेदवारी अर्ज येत्या २५ एप्रिलला भरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील पुण्यात आयोजित करण्यात आलीय. यातच मोहोळांना विजयी करण्यासाठी महायुतीतील प्रत्येकजण झपाटून काम करतांना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. यातच रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आले. त्यावेळी नाराज असलेल्या कॉंग्रेसचे माजी गटनेते आबा बागूल यांच्या विरोधात बॅनर्स झळकावून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. याची राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू झालीय.
पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले आबा बागूल यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतली होती. या घटनेनंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ‘नाराजांकडे जाणे, त्यांच्याशी बोलणे हे आमचे काम आहे.’ बागूल यांचीही नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.’ असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेसभवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या हकालपट्टीची मागणी करत काँग्रेस भवनाबाहेर पोस्टर झळकवले.’नागपूर येथे भाजप नेत्यांची भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध,’ अशा आशयाचे फलक झळकावले. तसेच, ‘गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा देखील देण्यात आला.
हेही वाचा…“विरोधकांची प्रचाराची वैचारिक पातळी घसरलीय”, सुनील तटकरेंचा हल्लाबोल
रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गत नाराजीने ग्रासले आहे. काँग्रेसच्या एका मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्यावरून झालेला वाद, त्यानंतर नेत्याचा फोटो बॅनरवरती लावला नसल्याच्या कारणावरून थेट मंडपवाल्यालाच मारहाण झाल्याचा प्रकार, काँग्रेस ओबीसी सेलच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून झालेला वाद, आबा बागुलांची नाराजी आणि आता पक्षाचे जेष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्याच दोन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर फलक झळकवत आबा बागुल यांची हकालपट्टीची केलेली मागणी यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामागचा पक्षांतर्गत कुरघोडीचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नाही.
READ ALSO :
हेही वाचा….‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ नानासाहेब नवलेंचे सुनेत्रा पवार यांना प्रशस्तीपत्रक
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपला उखडलं, कॉंग्रेसने जाहीर केली मोठी आकडेवारी
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला भरणार उमेदवार अर्ज, तर २९ तारखेला मोदींचा रोड शो अन् जाहीर सभा
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या ३ मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांवर पाणी टाकण्याचं काम मोदींनी केलं”