मुंबई : पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपाच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?,” असं म्हणता रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत कदम यांच्यावर टीका केली.
पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपाचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना जबर मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले. मारहाणीत खैरमोडे रक्तबंबाळ झाले होते.
मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2021
Read Also
सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्याला स्थगिती दिल्यानंतर शरद पवार म्हणतात ..
“त्या महिले सोबतच्या संबंधात दोन मुलं, मात्र माझ्यावरचे आरोप खोटे”; धनंजय मुंडेंनी केला खुलासा