अहमदनगर : आमदार रोहित पवार या आपल्या मुलाच्या मतदारसंघाचे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नाव उंचावण्यासाठी त्यांच्या मातोश्री बारामती ऍग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार या स्वतः स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन व्हावी’ हा मूलमंत्र देणाऱ्या आमदार माता सुनंदा पवार यांनी स्थानिक पातळीवर उतरून स्वच्छतेची सुरुवात केली आहेत. गवत,काट्यात हात घालून परीसर स्वच्छ करण्याची त्यांची ही ‘जिद्द’ अनेकांना प्रेरणादायी ठरू लागली आहे.
केंद्र सरकारचे नगरपंचायतीने साठी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा असते. या स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने भाग घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जतचा प्रथम क्रमांक कसा येईल? याबाबत आता जागरूकता निर्माण होत आहे. आधी करावे मग सांगावे’ या वचनाचे पालन करत आता अनेक राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटना वेगवेगळ्या प्रभागात जात स्वच्छतेच्या कामासाठी झोकून देत काम करत आहेत. सुनंदा पवार या देखील नागरिकांसोबत श्रमदानात सहभागी होत स्वच्छतेचे काम करताना दिसत आहेत.
थोर तुझे उपकार आई!♥️https://t.co/p03iyfGTtS pic.twitter.com/nij240D5G8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 12, 2020
Read Also
मुंबईत गेलेल्या विजेवरून कंगनाचे सरकारवर मिम ! नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊसhttps://t.co/zqQfSOz6vg#KanganaRanaut #PoweCut #ShivsenaMeme @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020