मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी करत सरकारने जबाबदारी झटकू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील आता बळीराजावर दुःखाचा डोंगर दूर करण्यासाठी केंद्राने राज्याचे जीएसटीचे थकीत 28 हजार कोटी द्यावे अशी मागणी केली आहे. “दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे… आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे.. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच, पण केंद्रानेही जीएसटीचे चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी ₹ तातडीने द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी.” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे…
आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच,
पणकेंद्रानेही #GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी ₹ तातडीने द्यावेत.
अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 20, 2020
दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि इतरही मंत्री दौरे करत आहेत. मात्र या दौऱ्यावरुन शेतकऱ्यांच्या मदतीबरोबरच आता राजकारण रंगत आहे.
Read also :
लाव रे तो व्हिडीओ ! देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जुने व्हिडीओ लावत साधला निशाणा https://t.co/cQd7YHs9tr#DevendraFadanvis #AjitPawar #CMUddhavthackarey #NCP #MahavikasAaghadi #BJP #Shivsena @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @OfficeofUT
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020