अहमदनगर : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. जालना-औरंगाबाद मध्ये काही लोकांवर हल्ला केल्यानंतर हा बिबट्या सोलालूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शिरला.
एका उसतोड कामगाराच्या मुलीवर हल्ला करुन तिची हत्या केल्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतात पाच एकर उसाचा फड जाळून…४ शार्प शूटर तैनात केलेले असतानाही या बिबट्याने धूम ठोकली.
आतापर्यंत किमान ५-६ जणांचा आपल्या हल्ल्यात जीव घेतलेल्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन-विभागाने दिले आहेत. यासाठी वन-विभागाने कर्मचारी सोलापूर, माळशिरस भागात गस्त घालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्या मतदारसंघाला लागून असलेल्या तालुक्यात जाऊन बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेचा आढावा घेतला.
माझ्या मतदारसंघात व शेजारच्या तालुक्यातही बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र प्रयत्नशील आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून काल करमाळा तालुक्यातील वांगी सांगवी इथं जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पोलीस व वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाची माहिती घेतली. pic.twitter.com/x8DLwkhv6u
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 11, 2020
गस्तीवर असलेल्या वन-विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत रोहित पवार यांनी कामाची माहिती घेतली. रात्रीच्या वेळी रोहित पवार हातात काठी घेऊन वांगी-सांगवी भागात आले होते. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी प्राण गमावले असल्यामुळे सध्या या भागात नागरिकांमध्ये दहशत आहे.
संध्याकाळी सात वाजल्यानंतर शक्य तो लोकं घराबाहेर पडण्याचं धाडस करत नाहीयेत. आतापर्यंत या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाल अपयश आलं असल्यामुळे स्थानिकांमध्ये वनविभागाविरोधात नाराजी आहे.
Read Also :
‘महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याप्रमाणे केंद्रात आघाडी…,’ संजय राऊतांचं सूचक विधान
‘…तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा’, ममता बॅनर्जींनी उडवली भाजप नेत्यांची खिल्ली
यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला, कारवर तुफान दगडफेक
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास