दिल्ली : एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे केंद्रात आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील असं संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी काँग्रेसवरही भाष्य केलं.
शरद पवार युपीएचे अध्यक्ष होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे.
शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही.
नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल.
ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
Read Also :
‘…तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा’, ममता बॅनर्जींनी उडवली भाजप नेत्यांची खिल्ली
यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला, कारवर तुफान दगडफेक
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास