कोल्हापूर : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सध्या साहेबांचा संदेश या कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी कोल्हापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अनेकांचा विरोध डावलून मुश्रीफांना संधी दिली पण आता त्यांचेच कार्यकर्ते अडचणी निर्माण करतांना दिसत आहेत. असं रोहित पवारांनी आरोप केला आहे. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“मोदी 2024 ला पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणारच नाही”
रोहित पवारांच्या टिकेला हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे म्हणून हे सर्व करीत आहे. असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुश्रीफांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोहित पवार राजकारणात नवखे आहेत. ते कशासाठी इतका मोठा धाडस करताहेत ते माहिती नाही. अजित पवार यांची जागा रोहित पवारांना घ्यायची आहे. असं वाटत आहे.
दरम्यान, १९९८ मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देऊ नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता MIDC मध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. तशा तक्रारी आमच्याकडे आधी देखील आल्या होत्या. आता देखील येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत. त्यामुळे तरूणांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“भारतीय कुस्ती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत,” UWW ची मोठी कारवाई, अमोल कोल्हे संतापले
हेही वाचा…“शरद पवारांनी मैदान मारलं, पण अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्यु्त्तर”, वाचा सविस्तर
हेही वाचा…“नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत” , शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र होणार ?
हेही वाचा…शिंदे अन् फडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच वाजलं, लोकसभेच्या या जागेसाठी जोरदार रस्सीखेच