पुणे : ‘जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षकाखाली चपराक प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील यांनी ब्लॉग लिहित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. घनश्याम पाटील यांच्या या टीकनेत मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे चांगल्याच भडकल्या असून, त्यांनी लेखकाला मनसे स्टाईल चोप देण्याचा इशाराच दिला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घनश्याम पाटील यांचा समाचार घेतला आहे. स्वतःला लेखक म्हणाऱ्या या बिकावू, स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेध. घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे की तुला कायदेशीर कारवाई तर करणार पण बिकावू लेखक म्हणून मनसे चोप पण देणार, असा सज्जड दमचा रुपाली ठोंबरे यांनी लेखकाला दिला आहे.
प्रसिद्धीसाठी कोणीही भुरटे लोक उठतात आणि स्वतःला लेखक म्हणून मानसिक रुग्णासारखे लिहितात. घनश्याम तुझ्या माहितीसाठी कृष्णकुंज वर न्यायासाठी लोक येतात. कारण लोकांची आणि आमची विश्वासाची स्टेलमेंट झाली आहे. हे लक्षात ठेव. तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव. घनश्याम ला त्याची जागा दाखवून देऊ की लेखक म्हणून तू छपरी, बिकावू आहेस, असेही त्यांनी फेसबुक पोस्टमधून म्हटले आहे.