IMPIMP
bjp bjp

ठाकरे सरकारला ‘औरंगजेब’ म्हणणाऱ्या समीत ठक्करला जामीन मंजूर

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या समीत ठक्करला जामीन मिळाला आहे. समीत ठक्करला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं काही अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.

समीतने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.  त्यानंतर त्याला 24 ऑक्टोबरला राजकोटमधून अटक करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. आज त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला आणखी एका प्रकरणात लगेच अटक केले.

32 वर्षांचा नागपूरचा तरुण समीत ठक्कर ट्विटर वर प्रचंड सक्रिय आहे. त्याचे ट्विटरवर 60 हजार फॉलोअर्स आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेलमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.