मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर बुधवारी (2 डिसेंबर) लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. आज (5 डिसेंबर) लीलावती रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पुढील दोन दिवस संजय राऊत घरीच आराम करणार आहेत.
सकाळी 11 च्या दरम्यान संजय राऊत लीलावती रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले. डॉक्टरांनी संजय राऊतांना यांना आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस ते घरीच आराम करतील. यानंतर सोमवारपासून (8 डिसेंबर) ते शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना ऑफिसला जातील, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संजय राऊत यांच्यावर बुधवारी (2 डिसेंबर) लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही वेळापूर्वीच ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी दोन स्टेन त्यांच्या ह्रदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. खरतंर, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीवेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.