मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टोला हाणला आहे. राज्यात आपल्या पहिली मुख्यमंत्री म्हणून एका महिलेला बसवायचं आहे. अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती मेळाव्यात केली आहे. त्यावरून राज्यात सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना नवनीत राणा यांनी देखील याचं स्वागत केलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी ठाकरेंवर टिकाही केली आहे.
महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला व्हावी हे शब्द उद्धव ठाकरे यांच्या मुखातून पचत नाहीत. ज्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायची हौस आहे. ते दुसऱ्याला मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न कसे पाहू शकतात? उद्धव ठाकरे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. अशी टिका करताच जर महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल अंसही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
“मी ऐकदा काय म्हटलं होतं ते अजित पवारांनी बघावं”; मंगल प्रभात लोढा
यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही भाष्य़ केलं आहे. संजय राऊत यांनी राजकारण करावं पण त्यात देवाला उतरवू नये. त्या वक्तव्याचा निषेध झालेला आहे. अडीच वर्षात तरूणांना नोकऱ्या दिल्या ते आधी त्यांनी सांगावं. एमपीएसच्या मुलांचे खुप प्रश्न आहेत. तुम्ही डॉक्टर, सिस्टर, ब्रदर्सची भर्ती केली नाही. लोकांसाठी राजकारण करा. जे घरात बसेल त्यांच्यासाठी राजकाऱण करू नका असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.
Read also
- “राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण”; राज ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल
- “गुवाहाटीत शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रूपये देण्यात आले ;” माजी खासदाराचा दावा
- वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना
- वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना
- मोठी बातमी..! नागपुर येथील आरएसएसचं मुख्य कार्यालय उडवून देण्याची धमकी