मुंबई : शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरून राष्ट्रवादीने काल रस्त्यावर उतरून मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील लोढा यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
त्यावर मंगल प्रभात लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार मोठे नेते आहेत, ते बोलू शकतात पण माझी त्यांना विनंती आहे, की शिवप्रतापदिनी प्रतापगडावर मी नेमकं काय म्हटलं आहे हे त्यांनी एकदा बघावं. मी तुलना केली नाही आणि करणारही नाही. मी नेमकं काय म्हटलं आहे हे बघितल्यानंतरच जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी म्हटलं पाहिजे. असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवारांना अधिकार आहे ते विरोधी पक्षनेते आहेत ते बोलू शकतात, पण माझ्याकडून काही चूक झाली नाही असं मी प्रामाणिकपणे सांगतो, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?
मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो. हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते. एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चुक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे. ? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे स्टेजवर असतानाचा त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, आपल्याला जबाबदारी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
“मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू
दरम्यान, काल मुंबई विभागीय राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी गद्दारीचा किडी मंगल प्रभात लोढा, पन्नास कोके एकदम ओके अशा घोषणा देत आजुबाजूला परिसर दणादणून सोडला. त्यामुळे राज्यातील राजकारण मागील काही दिवसापासून चांगलंच तापलेलं दिसून आलं आहे.
Read also
- “मोदी साहेब…! तुम्ही तुमच्या मेंटॉॅंस लोकांना तंबी देणार आहे का?” अन् रूपाली पाटील भडकल्या
- स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारेच मंदिराची जमीन हडपाताहेत”; काॅंग्रेसने भाजपला डिवचलं
- भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ.! देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
- “शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी