बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर देवस्थानची जमीन बळकवल्याप्रकरणी त्यांच्यासह पत्नी, धस यांचे भाऊ देविदास धस त्यासोबत मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान अशा पाच जणांवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता, पण..,” जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
बीड जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला होता. तर वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल असून, हिंदू देवस्थानच्या प्रकरणात मात्र गुन्हे दाखल झाले नसून, गुन्हे दाखल करण्याची मागणी करत पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
“मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढविणार”; राज ठाकरेंची घोषणा
तक्रार दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सुरेश धस यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने खाडे यांची तक्रारच एपआयआर म्हणून ग्राह्य धरत फौजदारी गुन्हे नोंद करा न नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. याच आदेशाच्या विरोधात सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
रूपाली पाटलांचा आक्रमकपणा आणखी वाढणार..; राष्ट्रवादीने सोपविली प्रवक्ते पदाची जबाबदारी
दरम्यान, या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर लातुर उत्पादक विभागाच्या तक्रारीनंतर कलम 13 (1) अ ब आणि कमल 12 (2) यासह कलम आयपीसी 456/67/68/71कलम 120 ब आणि 109 या कलमाअंतर्गत अजामानपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read also
- “शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी
- “ती टिप्पणी प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती”; उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
- देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?
- “मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू