पुणे : राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या आणि पुणे शहाराच्या उपाध्यक्ष रूपाली पाटील यांची आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा आवाज बुलुंद होण्याची शक्यता आहे. कारण रूपाली पाटलांनी अलिकडच्या काळात अनेक आंदोलने गाजवली आहेत. त्यामुळे आता पुण्यात रूपाली पाटली विरोधकांवर गरजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी रूपाली पाटील यांची प्रवक्ते पदी निवड केली आहे. त्यांनी याबाबत एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. यामध्ये महिलांशी संबंधित विविध विषयांवर जनतेमध्ये वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडणे असून अध्यक्ष शरद पवार, महिला अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी काम करावे लागेल असं म्हटलं आहे.
“बेळगावात बोलवून माझ्यावर हल्ला आणि कट रचण्याचा प्रयत्न”; संजय राऊत
दरम्यान, रूपाली पाटील यांनी मागच्या वर्षी अजित पवार यांच्या उपस्थित मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुण्यातील मनसेच्या अंतर्गत वादाला कंटाळून रूपाली पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं म्हटलं जातंय. मनसेत असताना रूपाली पाटील यांनी वेळोवेळी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलने केली आहेत. यासाठी त्यांना तुरूंगात देखील जावं लागलं.
“महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज”; छगन भुजबळ
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे पुणे शहाराची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुण्यात भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार टिकास्त्र सोडलं. त्यातच आता त्यांच्याकडे प्रवक्ते पद देण्यात आल्याने रूपाली पाटील आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारची विश्वासार्हता आता राहिलेली नाहीय”; आदित्य ठाकरेंची सरकारवर टिका
- “इतिहास विकृत करू नका”, कबरीवरून राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये जुंपली
- शिंदे-फडणवीसांनी तरूणांचा आतला आवाज ऐकला, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढविली
- “निवडणुकींच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात”; सेनेचा टोला
- येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”