मुंबई : दिवसेंदिवस महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद वाढतच चालला आहे. आता कर्नाटकच्या राज्यपालांनी देखील यावरून महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही कर्नाटकमध्ये बोलवण्यात आलं असून मला बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यामुळे वातावरण अजून जास्त तापलं आहे.
“अजित पवारांनी आपल्या उंचीचा विचार करून बोललं पाहिजे”; भाजपचा खोचक टोला
संजय राऊत यांनी 30 मार्च 2018 मध्ये कर्नाटकमध्ये प्रभोक्षक भाषण केल्याचं कर्नाटकने म्हटलं आहे. याप्रकरणी संजय राऊत यांना समन्सही बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगावात कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बेळगावाला जाणार आहे. पण कोर्टात जाताना माझ्यावर हल्ला करण्याचा कट असल्याची भिती संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.
राज्यपालांना पदमुक्त करण्याचे फडणवीसांकडून स्पष्ट संकेत, म्हणाले, “आम्ही देखील…;”
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दिपक केसरकर यांनी संजय राऊतांना पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्रातले राजकारणी म्हणून पुर्ण संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी बोलू. आवश्यक ते स्टेटमेंट घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पण संजय राऊत हे सीमा प्रश्नासंदर्भात बोलले त्यामुळे एका ज्येष्ठ नेत्यावर कारवाई होणे चुकचं ठरेल. आमचे वैचारीक मतभेद जरूर आहेत. पण महाराष्ट्र म्हणून आम्ही एकच आहोत. असंही दिपक केसरकर म्हणाले.
Read also
- “महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज”; छगन भुजबळ
- “सध्या राजकारणाची पातळी खुपच घसरली, आत्मचिंतनाची गरज”; सुप्रिया सुळे
- “अरेच्चा विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”; चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंचा घणाघात
- “चुक केली होती, ती फक्त दुरूस्त केली”; कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…! सेनेचा माजी आमदार शिंदे गटात