मुंबई : ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा मला चार आश्वासनं दिली गेली होती. मात्र त्यातील एकही पुर्ण झालं नाही. त्यानंतर मग चार दिवसाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अन् त्यांनी मला शिंदे गटात येण्याचं निमंत्रण दिलं. त्यानंतर मग मी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाण्याची निर्णय घेतला. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी दिली आहे.
“ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
शिवसेनेतील कोणत्याही नेत्यांवर माझी नाराजी नाही. फक्त मी त्याठिकाणी जाऊन चूक केली होती. ती आता दुरूस्त केली आहे. अशी प्रतिक्रिया देखील कृष्णा हेगडे यांनी दिली आहे. विमानतळाच्या परिसरातील जवळपास 1 लाख लोकं राहतात. त्यांचा पुनर्वसनाचा मुद्दा आहे. तसेच विर्ले पार्ले येथील रस्ता कटींगचा मुद्दा, संघटनांसाठी माझी काम करण्याची इच्छा होती. ते मला भेटलं नाही. अशी आश्वासनं देण्यात आली होती. परंतु ते पुर्ण झाली नाहीत. असंही ते म्हणाले.
“पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
सध्या एकनाथ शिंदे यांनी मला पक्षाचे उपनेते पद त्याचबरोबर प्रवक्ते पद देण्यात आलं आहे. तसेच पक्षाचं संघटन वाढविण्याची देखील जबाबदारी दिली आहे. तसेच माझ्या काही मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत आहेत. अन् त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना वेळ देताहेत. असंही ते म्हणाले.
“देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप
दरम्यान, काल वर्षा येथील शासकीय निवासस्थानी कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अन् बाळासाहेबांची शिवसेना पक्षात त्यांनी अधिकृतपणे प्रवेश केला. त्यामुळे याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…! सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- “अजित पवारांनी आपल्या उंचीचा विचार करून बोललं पाहिजे”; भाजपचा खोचक टोला
- राज्यपालांना पदमुक्त करण्याचे फडणवीसांकडून स्पष्ट संकेत, म्हणाले, “आम्ही देखील…;”
- “या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; राष्ट्रवादीची मागणी
- राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर