मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे पक्षाची बांधणी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अनेक खासदार, आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. यातच आता शिवसेनेचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसला आहे.
“पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
मुंबईतील विर्ले पार्ले भागातील प्रभावशाली नेता म्हणून कृष्णा हेगडे यांची ओळख आहे. सुरूवातीला काॅंग्रेस, भाजप आणि शिवसेना आणि आता बाळासाहेबांची शिवसेना असा हेगडे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी विर्ले पार्ले येथील भागात त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शिवसेनेतून काॅंग्रेसमध्ये आलेल्या संजय निरूपम यांच्याशी मतभेद झाल्यानं कृष्णा हेगडे यांनी नवा मार्ग स्विकारला होता.
“देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप
त्यानंतर हेगडेंनी काॅंग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसानंतर हेगडे यांनी भाजपची साथ सोडून शिवसेनेची वाट धरली.
“शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत, पण आमचं नवस अजून पुर्ण झालं नाही”; बच्चू कडू
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी वर्षा निवास स्थानी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, ह्या देखील उपस्थित होत्या.
Read also
- “अजित पवारांनी आपल्या उंचीचा विचार करून बोललं पाहिजे”; भाजपचा खोचक टोला
- राज्यपालांना पदमुक्त करण्याचे फडणवीसांकडून स्पष्ट संकेत, म्हणाले, “आम्ही देखील…;”
- “या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; राष्ट्रवादीची मागणी
- राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर
- “ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं