मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला गेले आहेत. त्यांचं गुवाहाटीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मंत्रीपद मिळालं नाही तरी दिव्यांग मंत्रालय भेटलं आहे. त्यांच्यासाठी मी कामाख्या देवीकडे प्रार्थना केली आहे. असंही ते म्हणाले.
“जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर.!” काॅंग्रेसची शिंदेंवर जहरी टिका
एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री झाले असले तरी आमचं नवस पुर्ण झालं नाही. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणुस, कष्टकरी, शेतकरी, मजूर यांच्या घरात आनंद झाला पाहिजे. असं म्हणत आम्ही मंत्रीपद मागत होतो. आम्हाला दिव्यांग मंत्रालयाच भेटलं आहे. आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही तरी हा विस्तार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचलं पाहिजे. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल हटाओ…! “पायात चपला घालून राज्यपालांकडून 26/11 च्या शहिदांच्या स्मृतीत अभिवादन”
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदासाठी बच्चू कडू आग्रही आहेत. त्यांनी मंत्रीपदाची इच्छा देखील वारंवार जाहीर बोलून दाखविली आहे. मात्र अलिकडेच ते ज्या दिव्यांगासाठी लढत होते. त्यांच्यासाठी राज्य सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरून त्यांनी आपण समाधानी असल्याचं म्हटलं आहे.
Read also
- “गुणरत्ने सदावर्ते दारू पिऊन करतो की काय?” जितेंद्र आव्हांडाची खोचक प्रतिक्रिया
- “देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो”; अरविंद केजरीवाल
- “शरद पवार, उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची मला किव येते”; गुणरत्ने सदावर्ते
- “राज्यात ठाकरे हेच खरं सरकार, तुम्ही आज बघतच रहा, ;” ठाकरेंची बुलढाण्यात आज सभा
- पोलिसांना चकवा देत संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम केला..!