मुंबई : सोलापुर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर शाईफेक करण्यात आली. विदर्भ, मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी गुणरत्ने सदावर्ते यांनी मागील काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच संदर्भात पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळी पावडर फेकली.
राज्यपाल हटाओ…! “पायात चपला घालून राज्यपालांकडून 26/11 च्या शहिदांच्या स्मृतीत अभिवादन”
सोलापुर येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर याठिकाणी गुणरत्ने सदावर्ते यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. ही बंदोबस्त भेदून संभाजी ब्रिगेडने त्याठिकाणी राडा करत गुणरत्ने सदावर्ते यांच्या अंगावर काळी पावडर फेकली. यामध्ये गुणरत्ने सदावर्ते यांच्या संपुर्ण अंगावर ती काळी पावडर पसरली गेली.
“हे माता कामाख्या देवी..! जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे”, रोहित पवारांचं ट्विट
त्यानंतर गुणरत्ने सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. संभाजी ब्रिगेड ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांची पिलावळ असल्याची टिका सदावर्ते यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सदावर्तेंना निशाण्यावर घेतलं. गुणरत्ने सदावर्ते यांनी दारू पिऊन शरद पवार यांच्या घरावर एसी कर्मचाऱ्यांना हल्ला करायला सांगितला होता. त्यावर बोलण्यात वेळ वाया घालवणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
Read also
- “देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो”; अरविंद केजरीवाल
- “शरद पवार, उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची मला किव येते”; गुणरत्ने सदावर्ते
- “राज्यात ठाकरे हेच खरं सरकार, तुम्ही आज बघतच रहा, ;” ठाकरेंची बुलढाण्यात आज सभा
- पोलिसांना चकवा देत संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम केला..!
- “जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर.!” काॅंग्रेसची शिंदेंवर जहरी टिका