मुंबई : वकिल गुणरत्ने सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागील दोन दिवसापासून ते स्वतंत्र्य मराठवाडा, आणि विदर्भ करण्यासाठी आंदोलने करीत आहेत. काल देखील त्यांनी यासाठी जोरदार आंदोलने केलीत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाहीतर उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांना टार्गेट केलं. परंतु आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.
“काय झाडी, काय डोंगरचा पार्ट-2 येणार..!’ गुवाहाटीला निघण्याअगोदर शहाजी पाटलांचं विधान
सोलापुर येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर याठिकाणी गुणरत्ने सदावर्ते यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. ही बंदोबस्त भेदून संभाजी ब्रिगेडने त्याठिकाणी राडा करत गुणरत्ने सदावर्ते यांच्या अंगावर काळी पावडर फेकली. यामध्ये गुणरत्ने सदावर्ते यांच्या संपुर्ण अंगावर ती काळी पावडर पसरली गेली.
उद्धव ठाकरेंची चिखलीत एल्गार सभा..! गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांवर तुटून पडणार?
पत्रकार परिषदेत गुणरत्ने सदावर्ते यांनी शरद पवारांचा उल्लेख करत वयोवृद्ध पुढारी आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बिळातील तत्कालीन मुख्यमंत्री असा केला. आज संविधान दिनी काही लोकांना आमच्या अंगावर सोडून आम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण आम्ही स्वांतत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेल्या सेल्युलर जेलमध्ये उपवास करून आलेली माणसं आहोत. असंही सदावर्तेंनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं
आम्हाला य़ा सगळ्या गोष्टी पानी कम चाय आहेत. मला शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची किव येते. त्यांनी संविधान दिनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना लाज वाटली पाहिजे. माझ्या हातात छत्रपती शिवाजी महारांजी प्रतिमा होती. तरीही माझ्या अंगावर काळी पावडर फेकण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरही ती काळी शाई फेकली. या लोकांनी आम्ही घाबरत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ, असं त्यानंतर गुणरत्ने सदावर्ते यांनी सांगितलं.
Read also
- “राज्यात ठाकरे हेच खरं सरकार, तुम्ही आज बघतच रहा, ;” ठाकरेंची बुलढाण्यात आज सभा
- पोलिसांना चकवा देत संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम केला..!
- “जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर.!” काॅंग्रेसची शिंदेंवर जहरी टिका
- राज्यपाल हटाओ…! “पायात चपला घालून राज्यपालांकडून 26/11 च्या शहिदांच्या स्मृतीत अभिवादन”
- “हे माता कामाख्या देवी..! जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे”, रोहित पवारांचं ट्विट