मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला रवाना झाले आहेत. त्याठिकाणी एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. याच काळात आमदार शहाजी बापू पाटील यांचा एक डॉयलॉग प्रसिद्ध झाला होता. आता पुन्हा एकदा त्याचा पार्ट 2 येणार असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं आहे.
“रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ”; राष्ट्रवादीने साधला निशाणा
राज्यात वैचारीक लढाई झाल्यानंतर महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्ही सुरूवातीला सुरतला गेलो होतो. परंतु मुंबईतील अनेक नको असलेले नेते आमच्या भेटीगाठी घेण्यासाठी हॉटेलच्या कडेने फिरायला लागलेत. त्यामुळे आम्हाला पुढे गुवाहाटीला जावं लागलं. त्यावेळी अनेक आमदारांनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी विनंती घेतली अन्. त्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही महाराष्ट्रात आलो. एक वैचारीक क्रांती घडली. जी अडीच वर्षापुर्वी घडली होती. देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचा घात करून आम्ही बाजूला झालो होतो. तीच चुक सुधारण्यासाठी आम्ही गुवाहाटीला गेलो. असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.
“अमृता वहिनी, हसून दाद देण्यापेक्षा रामदेव बाबांच्या कानाखाली मारली असती.!”रूपाली पाटील कडाडल्या
मागच्या वेळी आम्ही दर्शन घेतलं होतं. त्यावेळी आम्ही देवीला साकडं घातलं होतं. त्यावेळी आम्हाला ओरडून सांगितलं होतं की, यश तर येणारच आहे. परंतु पुन्हा एकदा देवीच्या दर्शनाला या. त्यामुळे आम्ही गुवाहाटीला जात आहे. तसेच काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेलचा पार्ट 2 येणार असून तो येथील महाराष्ट्र सरकावर असणार आहे. असंही ते म्हणाले.
त्याआधी अजित पवार यांनी गुवाहाटी दर्शनावर खोचक टोला हाणला आहे. कामाख्या देवीला रेडा बळी देण्यासाठी कदाचित शिंदे गट जात आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, रेडी बळी दिला जातो की नाही, हे अजित पवार, संजय राऊत आणि आम्ही देखील बघितलं नाही. काही काही ठिकाणी अशा पद्धतीचं बळी द्यावाच लागतो. तसेच उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर बोलताना ते म्हणाले की, हा मेळावा दोन वर्षापुर्वी झाला असता तर आम्हाला गुवाहाटीला जावं लागलं नसंत. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंची चिखलीत एल्गार सभा..! गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांवर तुटून पडणार?
- एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं
- “गुवाहाटीला निघालेल्या आमदारांचा कामाख्या देवी बळी घेणार”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
- “अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”; रामदेव बाबाचं वक्तव्य
- “देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय, सावध रहा!” भुजबळांचं कार्यकर्त्यांना इशारा