यवतमाळ : सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करा . पक्षाची संघटना बांधणी अधिक महत्वाची असते त्यासाठी अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बांधण्यात यावी. देशात सद्या धर्माच्या नावाने अफूची गोळी दिली जात आहे. धर्मा धर्मांमध्ये लढाई लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण एकसंघ राहून या विरोधात लढा दिला पाहिजे. असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले.
“एक पप्पू गेलेत आता दुसरे पप्पूही…;” नवनीत राणांचा आदित्य ठाकरेंना टोला, शरद पवार ही
आज यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे फुले, शाहू, आंबेकरांची विचारधारा आपल्याला समाजातील तळागाळात रुजवावी लागणार आहे. महात्मा फुल्यांच्या समाजसुधारणेच्या कामाला ब्राह्मणांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. भिडे, चिपळूणकर, भांडारकर असे अनेक सुधारक ब्राम्हण गृहस्थ शिक्षण,महिला सबलीकरण, केशवपन, बालहत्या प्रतिबंध,अंधश्रद्धा निर्मूलन या कामांमध्ये महात्मा फुल्यांसोबत होते. त्यामुळे बहुजन समाजाने अंधश्रध्देच्या पाशातून बाहेर यावे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
दरम्यान, देशात महागाई बेरोजगारी यावरून लक्ष हट्वले जात आहे. त्यासाठी नको त्या प्रश्नांवर चर्चा घडवली जात आहे. देशाच्या तिजोरीत ४० टक्के जीएसटी एकटा महाराष्ट्र देतो मात्र महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे.तसेच आर्थिक आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत त्यांनी मराठा समाजाला हक्काचे १० टक्के आरक्षण आणि आदिवासीं बहुल ठिकाणी कमी झालेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळाले पाहिजे. असंही ते म्हणाले.
Read also
- “रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ”; राष्ट्रवादीने साधला निशाणा
- “अमृता वहिनी, हसून दाद देण्यापेक्षा रामदेव बाबांच्या कानाखाली मारली असती.!”रूपाली पाटील कडाडल्या
- “महिलांनी काही घातले नाही, तरी त्या सुंदर दिसतात”; रामदेव बाबांचं वादग्रस्त व्यक्तव्य, अमृता फडणवीसही उपस्थित
- “एक दिवसासाठी माझ्याकडे इडी,सीबीआय सोपवा, भाजपचे अर्धे नेते तुरूंगात जातील”; अरविंद केजरीवाल
- “मालकाला खुश करण्यासाठी गुजरातची चाकरी;” राष्ट्रवादीने शेलारांना डिवचलं