मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहे. त्यासाठी गुवाहाटीमधील एका हॉटेलमधील 100 खोल्यांचे बुकिंग देखील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे गुवाहाटीला दोन दिवस राहणार आहेत. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन
मला कालच समजलं की, मागच्या वेळी ज्या हॉटेलमध्ये आमदार थांबले होते. त्या हॉटेलमधील बिल देण्याचं राहून गेलं होतं. त्यामुळे तेथील मालकांनी आत्महत्या केल्याचं समजलं आहे. आता ते बिल दिलं गेलं नाही म्हणून आत्महत्या केली की, दुसरं कारण होतं. ते काही सांगता येत नाही. पण चर्चा चालू होती. असं म्हणत त्यांनी टोला हाणला आहे.
“आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
तसेच आता हे आमदार त्याठिकाणी कशासाठी जाताहेत ते काही सांगता येत नाही. पण त्याठिकाणी म्हणे रेड्याचा बळी दिला जातो. मग ते रेड्याचा बळी देण्यासाठी जात आहे की, अजून कशासाठी? ते काही सांगता येणार नाही. तसेच जर दर्शनासाठी जात असेल तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार
दरम्यान, त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कामाख्या देवीला जाहीरपणे जाणार आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी हे सरकार स्थापन केले. आम्ही जे करतो ते उघडपणे करतोय. कुठल्याही मंदिरात जाण्यास अडथळा नाही. जे करतो ते निधड्या छातीनं करतो. माझ्यासोबत मंत्री होते. मीडिया होती. त्यामुळे आम्ही जे करतो ते लपूनछपून करत नाही. उघड करतो. दिवसाढवळ्या करतो. काही लपून करतात. असं म्हणत त्यांनी माजी मंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.
Read also
- यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार
- शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
- “देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला
- “विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- “भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची चौकशी थांबली नाही, फक्त मतांच्या गणितांसाठी करावं लागतं”; देवेंद्र फडणवीस