मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आसाम मधील कामाख्या मंदीर चर्चेत आले होते. बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी सुरतवरून थेट गुवहाटी गाठलं. त्यानंतर त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी सर्व बंडखोर आमदारांना घेऊन गेले. अन् त्यानंतर ते गोव्यावरून महाराष्ट्रात दाखल झाले. तेव्हा कामाख्या देवीचं मंदिर प्रचंड चर्चेत आलं होतं. त्यातच पुन्हा एकदा शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्याचीही सध्या खुप चर्चा सुरू आहे.
“भविष्य नाही तर दुसऱ्याचं कामासाठी मुख्यमंत्री गेले होते..!” त्या ज्योतिषानेच केला मोठा खुलासा
त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कामाख्या देवीला जाहीरपणे जाणार आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी हे सरकार स्थापन केले. आम्ही जे करतो ते उघडपणे करतोय. कुठल्याही मंदिरात जाण्यास अडथळा नाही. जे करतो ते निधड्या छातीनं करतो. माझ्यासोबत मंत्री होते. मीडिया होती. त्यामुळे आम्ही जे करतो ते लपूनछपून करत नाही. उघड करतो. दिवसाढवळ्या करतो. काही लपून करतात. असं म्हणत त्यांनी माजी मंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.
“तुम्हाला महाराष्ट्र असा-तसा वाटला का?” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार संतापले
आत्मविश्वास होता म्हणून 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडी सरकार कुणासाठी काम करायचं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांच्या मनातील सरकार स्थापन केले. 30 जुनला ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे. असही म्हणत त्यांनी शिवसेनेच्या बंडाळीवर भाष्य केले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्य़ांची पुन्हा चेतावणी..! आता थेट सोलापुर अन् अक्कलकोटवर ठोकला दावा
दरम्यान, मंत्री दिपक केसरकर यांनी देखील आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील आमदार गुवाहाटी दर्शन करणार आहेत. त्याची चर्चाही सध्या राज्यात जोरदार सुरू आहे.
Read also
- “आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- “हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार
- “राज्यातील सॅम्पल दुसरीकडे पाठवा..! नाहीतर सगळेजण एकत्र येऊन इंगा दाखवू”; ठाकरेंकडून महाराष्ट्र बंद चे संकेत
- “मंत्रिमंडळ बैठक रद्द करून खोके सरकार गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”; आदित्य ठाकरेंचा घणाघात
- राष्ट्रवादी-भाजपच्या लढाईत आता ‘आप’ची ही उडी..! खेड आळंदी मतदार संघात जोरदार चुरस होणार…?