नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले भविष्य बघण्यासाठी मंदिरात गेले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यावरून राज्यातील विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्योतिषाची भेट घेतली त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गोष्टीबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत मंत्री दिपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील होते. त्यांनी देखील भविष्य बघितलं असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे हे सिन्नर तालुक्यातील इशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या मंदिरात त्यांनी अंकशास्त्राचे अभ्यासक अशोक खरात यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे हे फक्त इशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी असं काही भविष्य पाहिलं नाही. असं अशोक खरात यांनी म्हटलं आहे.
“देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
दरम्यान, दिपक केसरकर यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, मी साईबाबाचा निस्मिम भक्त आहे. शिंदे साहेबांनी गोशाळेचं काम सुरू होण्याआधी भेट घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती. कॅप्टन खरात यांचं प्रोफेशन भविष्य सांगण्याचं आहे. पण शिंदे यांनी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर ते तिथे का जातील? त्यांनी खरात यांना मुंबईत बोलावून घेतलं असतं. असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच खरात हे शिवभक्त असून त्यांनी गोशाळा बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. त्याबद्दल त्याला निधी दिलं आहे. असंही ते म्हणाले.
“..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या
दरम्यान, या संपुर्ण प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाची कुठेना कुठे निष्ठा असते याबाबत दुमत नाही. जे वृत्त वाचण्यात आले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी. असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपुर येथे गेलो तर दर्शन घेतो, आपली ती पंरपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र ज्योतिषाकडून जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. 21 व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना विज्ञान काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
Read also
- “तुम्हाला महाराष्ट्र असा-तसा वाटला का?” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार संतापले
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्य़ांची पुन्हा चेतावणी..! आता थेट सोलापुर अन् अक्कलकोटवर ठोकला दावा
- “आता काय बोलावं ?पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात ;” अजित पवारांचा खोचक टोला
- कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा..! उदयन राजेंचं पत्राद्वारे मागणी
- साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं