नाशिक : मंत्रिमंडळाच्या सगळ्या बैठका रद्द झाल्याने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी गेले. मात्र साई दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट वावी जवळच्या महादेश मंदिरात गेला. अन् त्या मंदिरात महादेवाला अभिषेकानंतर मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.
“निवडणुका जिंकण्यासाठी मैदानात उतरू, तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश
शिंदे-फडणवीस यांना सरकार वाचवण्यासाठी देवदर्शन करू द्या. ज्योतिष्याकडे भविष्य बघू द्या. रेड्याचा बळी देऊ द्या. या सरकारचा निरोपसमारंभाचा कार्यक्रम तर होणारच. एकाच टर्ममध्ये 4 दिवसाचे मुख्यमंत्री 4 महिन्यांचे उपमुख्यमंत्री, अन् अडीच वर्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस ओळखले जातील. असा खोचक टोलाही सुरज चव्हाण यांनी लगावला आहे.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकांना सुट्टीचे आदेश..! अजित पवार म्हणाले, मी तर…
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे मंत्री गुजरातला गेल्याने काल मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह शिर्ड़ीला गेले. परंतु परतत असताना मुख्यमंत्र्यांनी थेट वावी जवळच्या मंदिरात नेला. अन् त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपलं भविष्य बघितलं असल्याची माहिती काल समोर आली. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टिका केली आहे.
“मला तळमळतंय, जळजळतंय, तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या..!” भाजपचा सुळेंना टोला
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह 40 बंडखोर आमदारांवरील निलंबणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावर अद्यापही निकाल लागलेला नाही. त्यामुळे या आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार अजूनही आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही. ते लवकरच कोसळेल. अशा प्रकारचं वक्तव्य विरोधकांकडून सातत्याने केलं जात आहे.
Read also
- “..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या
- पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना राज्य सरकारचे ‘‘रेड कार्पेट’’..! मुंबईतील मॅरेथॉन बैठकीत प्रलंबित प्रश्नांना गती
- आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा
- “जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये”; जयंत पाटील
- आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट…! राजकीय वर्तुळात चर्चा