मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरे भेट घेतली आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
“जीव धोक्यात असतानाही सरकारने माझी सुरक्षा काढली, सरकार माझ्या जीवाशी खेळतंय”; संजय राऊत
आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाण्याअगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,तेजस्वी यादव आणि मी जवळपास एकाच वयाचे तरूण नेते आहोत. या भेटीत आमच्यात त्यांनी हाती घेतलेली कामं, तसेच पर्यावरण अशा अनेक गोष्टींबाबत चर्चा कदाचित होऊ शकते. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधक ज्या पद्धतीने आरोप करीत आहेत. त्या घाणेरड्या राजकारणात मला जायचं नाही. आणि कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही. असंही ते म्हणाले.
“गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय, अन् तरीही सरकार शांत”
आज त्यांनी पटना याठिकाणी तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांचं तेजस्वी यादव यांनी जोरदार स्वागत केलं. तर आदित्य ठाकरेंना तेजस्वी यादव यांनी लालप्रसाद यादव यांच्या जीवनावरील पुस्तक भेट दिलीत. तर आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वी यादव यांना भेट दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की, तेजस्वी यादव आणि मी आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच. आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे. असंही ते म्हणाले.
आज बिहारचे उपमुख्यमंत्री व राजद चे युवानेते @yadavtejashwi यांची पटना, बिहार येथे भेट घेतली. आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे. या प्रसंगी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वी जीं ना भेट दिली. pic.twitter.com/sXMiBURqFR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 23, 2022
Read also
- “निवडणुका जिंकण्यासाठी मैदानात उतरू, तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश
- गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकांना सुट्टीचे आदेश..! अजित पवार म्हणाले, मी तर…
- “मला तळमळतंय, जळजळतंय, तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या..!” भाजपचा सुळेंना टोला
- “थंड पडलेलं सरकार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले…”राष्ट्रवादीचा खोचक टोला
- सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचे दोन व्हिडीओ केले ट्विट..! म्हणाल्या, “विरोधात असताना अन् सत्तेत”