उस्मानाबाद : शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी चर्चेचं कारण पहिल्यापेक्षा वेगळचं आहे. त्यांनी तुळजाभवानी देवीला तब्बल 75 तोळं अर्पण केलं आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत उस्मानाबाद येथील तुळजाभवानीचं काल दर्शन घेतलं. त्याचं कारणही त्यांनी प्रसार माध्यामांशी बोलतांना सांगितलं आहे.
“जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये”; जयंत पाटील
तुळजाभवानी आमची कुलदैवत आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसंच दोन्ही नातवंडांचं जायवळ करायचं होतं. नवस फोडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा 51 तोळ्यांच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देईन असं म्हटलं होतं. मध्यंतरी कोराना काळ आणि काही संकटांमुळे येता आलं नव्हतं. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेलं नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो. असंही त्यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट…! राजकीय वर्तुळात चर्चा
प्रताप सरनाईक यांनी तब्बल 37 लाख 50 हजार किंमतीचे 75 तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टचाराचे आरोप केले होते. मात्र शिंदे सोबत त्यांनी भाजपशी युती केल्याने त्यांच्यावरील आरोप मावळला आहे. त्यावरून आता त्यांना विरोधक सातत्याने डिवचत आहेत.
Read also
- बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील, आमदार महेश लांडगे अन् टीम दिल्लीला रवाना
- “देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या
- पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना राज्य सरकारचे ‘‘रेड कार्पेट’’..! मुंबईतील मॅरेथॉन बैठकीत प्रलंबित प्रश्नांना गती
- आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा