पुणे : मंत्रिमंडळाची काल बैठक रद्द झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शिर्डी येथे दर्शनाला गेले होते. मात्र शिर्डी येथील साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वावी जवळच्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. परंतु याठिकाणी त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतोय मला समजत नाही. प्रत्येकाची कुठेना कुठे निष्ठा असते याबाबत दुमत नाही. जे वृत्त वाचण्यात आले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी. असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपुर येथे गेलो तर दर्शन घेतो, आपली ती पंरपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र ज्योतिषाकडून जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. 21 व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना विज्ञान काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा
शिंदे-फडणवीस यांना सरकार वाचवण्यासाठी देवदर्शन करू द्या. ज्योतिष्याकडे भविष्य बघू द्या. रेड्याचा बळी देऊ द्या. या सरकारचा निरोपसमारंभाचा कार्यक्रम तर होणारच. एकाच टर्ममध्ये 4 दिवसाचे मुख्यमंत्री 4 महिन्यांचे उपमुख्यमंत्री, अन् अडीच वर्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस ओळखले जातील. असा खोचक टोलाही राष्ट्रवादीचे युवानेते सुरज चव्हाण यांनी लगावला आहे.
Read also
- कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा..! उदयन राजेंचं पत्राद्वारे मागणी
- साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं
- बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील, आमदार महेश लांडगे अन् टीम दिल्लीला रवाना
- “देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या