मुंबई : महाराष्ट्राचा अलिकडे सातत्याने अपमान होत असून आता कर्नाटक सरकारनेही राज्यातील काही गावांवर दावा सांगितला आहे. कारण आता राज्यात मिंधे सरकार सत्तेत आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे की नाही. असाही सवाल आहे. यातच आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला सांगून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला आहे. त्यामुळे आता भाजपचे लक्ष्य आता महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न आहे. असा हल्लाबोल आता शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा देखील यावेळी खरपुस समाचार घेतला.
“आता काय बोलावं ?पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात ;” अजित पवारांचा खोचक टोला
राज्यापालांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, आता राज्यातील प्रमुख नेतेही यावर बोलले आहेत. आता वेळ आली आहे की, ह्या राज्यापालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोही राज्यपालांचा विरोध महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांनी आपला पक्ष बाजूला ठेऊन विरोध केला पाहिजे. दोन ते तीन दिवसाची वाट पाहू त्यानंतर आपण भारत बंद, मोर्चे, आंदोलने काढलं पाहिजे. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा..! उदयन राजेंचं पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्राची अस्मिता आणि लक्तरे हे महाराष्ट्रद्रोही काढत आहे. त्यामुळे हे सर्व बघत बसण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्रित येऊन या राज्यापालांना आपला इंगा दाखविला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र बंद, मोर्चा, या सगळ्या मार्गाने राज्यपालांचा निषेध करूया. यासाठी भाजपच्याही नेत्यांनी आम्ही आमंत्रण देत आहोत. जर छत्रपतींचं नाव चिरडलं जात असेल तर आपल्याला छत्रपतींचं नाव घ्यायला नालायक आहोत. असा टोलाही त्यांनी लगावला.
साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरलं. केंद्र सरकारने आमच्या राज्यात जे सॅम्पल पाठवलं आहे. ते कुठंही पाठवा. नाहीतर आम्हाला शांत बसता येणार नाही. त्यासाठी आताच वेळ आहे. नाहीतर यांनीच एक जाहीरात केली होती की, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, तशीच वेळ अन्यथा आपल्यावर येईल. अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.
Read also
- “मंत्रिमंडळ बैठक रद्द करून खोके सरकार गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”; आदित्य ठाकरेंचा घणाघात
- राष्ट्रवादी-भाजपच्या लढाईत आता ‘आप’ची ही उडी..! खेड आळंदी मतदार संघात जोरदार चुरस होणार…?
- “भविष्य नाही तर दुसऱ्याचं कामासाठी मुख्यमंत्री गेले होते..!” त्या ज्योतिषानेच केला मोठा खुलासा
- “तुम्हाला महाराष्ट्र असा-तसा वाटला का?” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार संतापले
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्य़ांची पुन्हा चेतावणी..! आता थेट सोलापुर अन् अक्कलकोटवर ठोकला दावा