खेड, प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर राज्यातील सगळीच राजकीय समीकरणं बदलली आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदार संघात विद्यामान आमदार म्हणून सध्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपचा मोठा सामाना करावा लागणार आहे. कारण राष्ट्रवादीच्या विरोधातील माजी आमदार सुरेश गोरे यांचं 2020 लाच कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यातच आता खेड आळंदी विधानसभा मतदार संघात ‘आप’ पक्ष देखील डोकं वर काढू लागलं आहे.
साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पाठोपाठ काॅंग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये देखील आपचा झेंडा फडकवला. त्यानंतर आता त्यांचं पुढचं लक्ष्य गुजरात विधानसभा जिंकण्याचं आहे. याच दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात आप मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘आप’ने प्रत्येक मतदार संघात लक्ष्य केंद्रीत केलं आहे.
त्याचीच तयारी म्हणून खेड आळंदी विधानसभा मतदार संघात आम आदमी पार्टीच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचं आयोजन ४ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आलं आहे. तालुक्यातील प्रमुख प्रश्न आणि उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आप युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत उपस्थित राहणार आहेत.
“देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
दरम्यान, खेड आळंदी विधानसभा मतदार संघावर सध्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्यावर तब्बल 33 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यातच तिसरा उमेदवार म्हणून भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांनी देखील जोरदार लढत दिली होती. आता शिंदेंच्या बंडामुळे भाजप, राष्ट्रवादीमध्ये चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे. पंरतु या लढाईत आता आम आदमी पार्टी देखील उतरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने याठिकाणी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
Read also
- “भविष्य नाही तर दुसऱ्याचं कामासाठी मुख्यमंत्री गेले होते..!” त्या ज्योतिषानेच केला मोठा खुलासा
- “तुम्हाला महाराष्ट्र असा-तसा वाटला का?” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार संतापले
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्य़ांची पुन्हा चेतावणी..! आता थेट सोलापुर अन् अक्कलकोटवर ठोकला दावा
- “आता काय बोलावं ?पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात ;” अजित पवारांचा खोचक टोला
- कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा..! उदयन राजेंचं पत्राद्वारे मागणी