मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. यातच शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीक वाढल्याची काही दिवसापासून दिसून येत आहे. त्यातच मागील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अमोल कोल्हे यांनी गैरहजेरी लावल्याने कोल्हे चर्चेत आले होते. त्यातच आज पुन्हा एकदा अशाच कारणाने अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत.
“हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार
जिल्ह्या नियोजन समितीच्या आढावा बैठकीत विकासकामांना मंजूरी देण्याची मागणी अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्या विनंती मान देऊन चंद्रकांत पाटलांनी तात्काळ शिरूर मतदारसंघातील विविध कामांसाठी 17.19 कोटींचा निंधी मंजूर केला आहे. त्यासाठी अमोल कोल्हे यांनी चंद्रकांत पाटलांचे आभार मानले आहेत. तसेच गेल्या काही महिन्यांपासून स्थगिती असलेली अनेक कामे आता लवकरच मार्गी लागतील. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
अलिकडच्या काळात दिल्लीत अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तसेच मागील काही घटनांवरून अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अमलो कोल्हेंच्या मतदार संघासाठी निधी मंजूर केल्याने पुन्हा एकदा चर्चेंना उधान आलं आहे.
“मंत्रिमंडळ बैठक रद्द करून खोके सरकार गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”; आदित्य ठाकरेंचा घणाघात
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदार संघाच्या विकास कामांसाठी निधींची मागणी केली होती. त्यात शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध कामांचे प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार ग्रामीण मार्ग 3 कोटी, नागरी सुविधा 2 कोटी 15 लाख रूपये, जनसुविधा 2 कोटी 59 रूपये, 5054 अंतर्गत 3 कोटी 45 लाख रूपये, साकव पुलांसाठी 6 कोटी रूपये अशा एकूण 17 कोटी 19 लाख रूपयांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली आहे.
Read also
- “देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला
- “विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- “भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची चौकशी थांबली नाही, फक्त मतांच्या गणितांसाठी करावं लागतं”; देवेंद्र फडणवीस
- बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन
- “आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?