मुंबई : राजकीय नेत्यांच्या भाषेच्या घसरलेल्या पातळीला काही प्रमाणात सोशल मीडिया देखील जबाबदार आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या अनेकांना समोर बोलण्याची हिम्मत नसल्याने ते या माध्यामांवर पातळी सोडतात. यावर तुर्तास कायदा नसल्याने त्यासाठी नवी व्यवस्था करण्याचा मानस आहे. अस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी त्यांना शाब्दिक टोला हाणला आहे.
देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपाच आहे. सगळ्यात मोठी ट्रोल्स आर्मी ही भाजप- संघ समर्थकांची आहे. द्वेष, तिरस्कार पसरवण्याचे, विरोधकांचे प्रतिमाहनन करण्यासाठी भाजप यांचा उपयोग करते. काॅंग्रेस विरोधात येथेच्छ वापरलेले गेलेले हे अस्त्र भाजपवरच उलटच आहे म्हणून ही उपरती आहे. असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे.
“मंत्रिमंडळ बैठक रद्द करून खोके सरकार गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”; आदित्य ठाकरेंचा घणाघात
सोशल मीडियाबरोबर आर्थिक गुन्हेगारी आणि सायबर क्राईमचा प्रश्नही सोडवण्यासाठी राज्य सरकार महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेत असून, पासपोर्ट कार्यालायप्रमाणे त्याचे आऊटसोर्सिंग करण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून केले जाणारे ट्रोलिंग, अपप्रचार, तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच वाढणारी सायबर गुन्हेगारी, आणि आर्थिक गुन्हेगारींला आळा घालण्यासाठी राज्य सरकार नवी व्यवस्था उभी करण्याचा विचार करीत असल्याचं फडणवीसांना सांगितलं आहे.
देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपाच आहे. सगळ्यात मोठी ट्रोल्स आर्मी ही भाजपा-संघ समर्थकांची आहे. द्वेष, तिरस्कार पसरवण्याचे, विरोधकांचे प्रतिमाहनन करण्यासाठी भाजपा यांचा उपयोग करते. काँग्रेस विरोधात यथेच्छ वापरले गेलेले हे अस्त्र भाजपा वरच उलटत आहे म्हणून ही उपरती आहे. pic.twitter.com/azfQaU48qz
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 25, 2022
Read also
- “विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- “भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची चौकशी थांबली नाही, फक्त मतांच्या गणितांसाठी करावं लागतं”; देवेंद्र फडणवीस
- बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन
- “आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- “हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार