पुणे : महिलांनी काही घातलं नाही तरी त्या खुप सुंदर दिसतात. असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरून राज्यात संतत्प प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे.
“शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ आहे. पर स्त्री मातेसमान या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा सुसंस्कृत महाराष्ट्रात असे विधान करणाऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ गुन्हा नोंद करत तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केली आहे. तसेच इतर नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार
कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा? असा खोचक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रामदेव बाबांची शाळा घेतली आहे. महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या पंरपरेला तडा दिला आहे. छाटी भगवी मानसी, व्यर्थ म्हणे मी संन्यासी तुका म्हे तोचि वेडा त्याचे हाणून थोबाड फोडा. असं म्हणत त्यांनी रामदेव बाबांवर टिका केली आहे.
शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
दरम्यान, संभाजी भिडे यांनी देखील अलिकडेच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एका महिला पत्रकारांनी टिकली लावली नसल्याने भिडेंनी त्यांच्याशी संवाद साधण्याचं टाळलं होतं. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी मैदानात उतरली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर राज्यात मोठा गोंधळ माजण्याची शक्यता आहे.
रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ आहे. “पर स्त्री मातेसमान” या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा सुसंस्कृत महाराष्ट्रात असे असे विधान करणाऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ गुन्हा नोंद करत तात्काळ कारवाई करावी. @mieknathshinde @Dev_Fadnavis #Ramdevbaba
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) November 25, 2022
Read also
- “अमृता वहिनी, हसून दाद देण्यापेक्षा रामदेव बाबांच्या कानाखाली मारली असती.!”रूपाली पाटील कडाडल्या
- “महिलांनी काही घातले नाही, तरी त्या सुंदर दिसतात”; रामदेव बाबांचं वादग्रस्त व्यक्तव्य, अमृता फडणवीसही उपस्थित
- “एक दिवसासाठी माझ्याकडे इडी,सीबीआय सोपवा, भाजपचे अर्धे नेते तुरूंगात जातील”; अरविंद केजरीवाल
- “मालकाला खुश करण्यासाठी गुजरातची चाकरी;” राष्ट्रवादीने शेलारांना डिवचलं
- “एक पप्पू गेलेत आता दुसरे पप्पूही…;” नवनीत राणांचा आदित्य ठाकरेंना टोला, शरद पवार ही