पुणे : महिलांनी काही घातलं नाही तरी त्या खुप सुंदर दिसतात. असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरून राज्यात संतत्प प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे.
यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार
विशेष म्हणजे त्याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. त्यावरून रूपाली पाटील म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांनी रामदेव बाबांच्या व्यक्तव्यावर हसून दाद देण्यापेक्षा कानाखाली मारली असती तर महिलांना उपमुख्यमंत्री साहेबांच्या पत्नी सक्षमपणे महिलांच्या सक्षमतेसाठी सुरक्षेतसाठी आहातच याची खात्री झाली असती. महिलाच महिलेचा सन्मान वाढू शकते.
शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलानाचे आय़ोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रामदेव बाबा महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की, महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त बाबा रामदेव यांनी केले आहे.
Read also
- “महिलांनी काही घातले नाही, तरी त्या सुंदर दिसतात”; रामदेव बाबांचं वादग्रस्त व्यक्तव्य, अमृता फडणवीसही उपस्थित
- “एक दिवसासाठी माझ्याकडे इडी,सीबीआय सोपवा, भाजपचे अर्धे नेते तुरूंगात जातील”; अरविंद केजरीवाल
- “मालकाला खुश करण्यासाठी गुजरातची चाकरी;” राष्ट्रवादीने शेलारांना डिवचलं
- “एक पप्पू गेलेत आता दुसरे पप्पूही…;” नवनीत राणांचा आदित्य ठाकरेंना टोला, शरद पवार ही
- “शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला