मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठलं होतं. त्यावेळी तेथील कामाख्या देवीचं मंदिर प्रंचड चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“एक दिवसासाठी माझ्याकडे इडी,सीबीआय सोपवा, भाजपचे अर्धे नेते तुरूंगात जातील”; अरविंद केजरीवाल
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार विशेष विमानानं आज मुंबईहून गुवाहाटीला निघाले आहेत. गुवाहाटीमध्ये दोन दिवस थांबणार असून तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यावरून त्यांना डिवचण्यात आलं आहे. शिंदे फडणवीस सरकार पडावं ह्या ‘श्री’ च्या इच्छेबरोबरचं जनतेची, सरकारमधील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याची सुद्धा इच्छा आहे. कामाख्या देवी 18 आमदाराबरोबर पद्धतीने बनलेल्या सरकारचा बळी घेणार. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“मालकाला खुश करण्यासाठी गुजरातची चाकरी;” राष्ट्रवादीने शेलारांना डिवचलं
शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोरांना तेथील एक हॉटेल बुक करण्यात आलं आहे. जवळपास 100 खोल्या आमदार, मंत्र्यांना बुकींग केल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता गुवाहाटीला दोन दिवस थांबणार असून तेथील कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व कामकाज बाजूला सारून राज्यातील नेते देव दर्शनाला जात असल्याने त्यांच्यावर आता चहूबाजूंनी टिका होऊ लागली आहे.
चलो गुवाहाटी! pic.twitter.com/zo3ilFxj3y
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) November 26, 2022
Read also
- “अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”; रामदेव बाबाचं वक्तव्य
- “देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय, सावध रहा!” भुजबळांचं कार्यकर्त्यांना इशारा
- “रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ”; राष्ट्रवादीने साधला निशाणा
- “अमृता वहिनी, हसून दाद देण्यापेक्षा रामदेव बाबांच्या कानाखाली मारली असती.!”रूपाली पाटील कडाडल्या
- “महिलांनी काही घातले नाही, तरी त्या सुंदर दिसतात”; रामदेव बाबांचं वादग्रस्त व्यक्तव्य, अमृता फडणवीसही उपस्थित