मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेलं आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्याने, कर्नाटक सीमावाद, तसेच वादग्रस्त वक्तव्य यावरून सत्ताधारी पक्षावर विरोधक निशाणा साधत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय, सावध रहा!” भुजबळांचं कार्यकर्त्यांना इशारा
त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हे माता कामाख्या देवी, राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना करतो. सत्ताबदलासाठी तु आशीर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी, राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ”; राष्ट्रवादीने साधला निशाणा
तसेच वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं. अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी. राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा. अंधश्रद्धा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये. तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित राहावी. हे अडचणीचे डोंगार पार करण्यासाठीही जे जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे. असं साकडं रोहित पवार यांनी कामाख्या देवीला घातलं आहे.
“अमृता वहिनी, हसून दाद देण्यापेक्षा रामदेव बाबांच्या कानाखाली मारली असती.!”रूपाली पाटील कडाडल्या
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले आहेत. ते गुवाहाटीला दोन दिवस थांबणार असून त्यासाठी एका हॉटेलमधील 100 खोल्या देखील बुकींग केल्या आहेत. त्यानंतर ते सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
हे माता कामाख्या देवी..
राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना!
सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी..
राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये..
युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये..
महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये..
वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, pic.twitter.com/YYuC39W6um— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 26, 2022
Read also
- “काय झाडी, काय डोंगरचा पार्ट-2 येणार..!’ गुवाहाटीला निघण्याअगोदर शहाजी पाटलांचं विधान
- उद्धव ठाकरेंची चिखलीत एल्गार सभा..! गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांवर तुटून पडणार?
- एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं
- “गुवाहाटीला निघालेल्या आमदारांचा कामाख्या देवी बळी घेणार”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
- “अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”; रामदेव बाबाचं वक्तव्य