मुंबई : देवस्थानची जमीन बळकवल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, धस यांचे भाऊ देविदास धस त्यासोबत मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान अशा पाच जणांवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावरून राज्यात विरोधकांनी भाजपवर सडकून टिका केली आहे.
“मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू
धर्माच्या नावावर राजकारण करून मतं मागायची आणि त्यानेही पोट नाही भरलं की मंदिराची जमीन हडपायची. जनतेला फसवणारं आणि जमीन हडपणारं, भाजपचं हे कुठलं हिंदुत्व आहे ? असा सवाल काॅंग्रेसने भाजपला केला आहे. तर स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारेच हिंदूच्या मंदीरांची जमीन हडपाताहेत. असा खोचक टोलाही काॅंग्रेसने भाजपला हाणला आहे.
“माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता, पण..,” जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
बीडच्या आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपुर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
“मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढविणार”; राज ठाकरेंची घोषणा
दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सुरेश धस यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने खाडे यांची तक्रारच एपआयआर म्हणून ग्राह्य धरत फौजदारी गुन्हे नोंद करा न नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. याच आदेशाच्या विरोधात सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
धर्माच्या नावावर राजकारण करून मतं मागायची आणि त्यानेही पोट नाही भरलं की मंदिराची जमीन हडपायची.
जनतेला फसवणारं आणि जमिन हडपणारं, भाजपचं हे कुठलं हिंदुत्व आहे? pic.twitter.com/QBQ2BGrkrc
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 30, 2022
Read also
- भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ.! देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
- “शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी
- “ती टिप्पणी प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती”; उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
- देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?