मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर शिवसेनेने अग्रलेख लिहत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवले. विशेष म्हणजे हे पत्र सामना या मुखपत्रातही छापण्यात आले आहे. या पत्रावरील मजकुरावर आक्षेप घेत खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रातील आरोप फेटाळत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मात्र सव्वा रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले राऊत
चंद्रकांत पाटलांनी आमच्या एका अग्रलेखावर पत्र पाठवले. आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्याचप्रमाणे त्यांना आमच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचे पत्र आजच्या सामनात छापले. जेणेकरून पाटलांची विषारी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळेल. “पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा! चाकणकरांची उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे,” अशी टीका राऊत यांनी केली. तसेच भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केले आहे. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का, असा सवालही राऊतांनी केला आहे.
काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत – शिवसेना
“मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असं पाटलांनी म्हटले आहे.”
Read Also :
- ‘सामना’चे धन्यवाद! चंद्रकांतदादांच्या लेखणीला फेस! अग्रलेखाला दिलेलं उत्तर जसंच्या तसं छापलं!
- पुण्यातील कात्रज चौकातील ६ पदरी उड्डाणपुलाचे शुक्रवारी भूमीपूजन; योगेश टिळेकरांच्या पाठपूरवठ्याला यश
- मोठी बातमी : अखेर मंत्री अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल
- शिवसेनेचे नेते अनंत गीते बरोबर बोलले, पवार आमचे गुरू होवू शकत नाहीत – नाना पटोले
- शिवसेना नेते अनंत गिते ‘त्या’ हॉटेलमध्ये शरद पवारांच्या पाया पडले होते; सुनील तटकरे आक्रमक