मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे” असे वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी केले. त्याला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.
काँग्रेसच्या २ नेत्याचे घोटाळे काढल्यास फडणवीसांच्या काळातील फाईल बाहेर काढणार – नाना पटोले
“2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी नावाची लाट आली असताना रायगड मतदारसंघातील जनतेने गिते यांना पराभूत केले. ते विजनवसात कुठे होते, माहीत नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड होत असताना अनंत गिते आले होते. तेव्हा पवार साहेब होते. त्यांनी वाकून पवार साहेबांच्या पायाला हात लावून आभार मानले होते” असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
“चंद्रकांत पाटील यांनी एक महिन्याआधी असंच वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला फक्त संजय राऊत यांनी उत्तर दिले होते. याला माजी केंद्रीय मंत्री उत्तर देतील असं वाटलं होतं. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. अशी अनंत गितेची अवस्था आहे. ते बोलल्याने फरक पडत नाही. सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार आघाडीचे जनक आहेत. उद्धव ठाकरे सक्षमपणे कारभार चालवत आहेत” असे सुनील तटकरे म्हणाले.
शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
“अडगळीत पडलेल्या नेत्यांना भान राहिलेलं नाही. त्याच नैराश्यापोटी आलेल विधान आहे. एक व्यक्ती बोलल्याने पवार साहेबांचं स्थान कमी होणार नाही. स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचा प्रश्न नाही. रायगड मध्ये आघाडी धर्म पळून काम करत आहोत. स्थानिक पातळीवर संवाद कसा राहील याची काळजी घेत आहोत” असे सुनील तटकरे म्हणाले.
Read Also :
- शिवसेना नेत्याने पवारांबद्दल केलेले वक्तव्य सत्यपरिस्थितीवर आधारित – देवेंद्र फडणवीस
- राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले; राज्यपालाचे मुख्यमंत्र्याकडे बोट, मुख्यमंत्र्याचे केंद्राकडे
- शरद पवार आमचे नेते होवून शकत नाहीत, पवारसाहेब देशाचे…..; संजय राऊतांचा स्पष्टीकरण
- जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, विजय मिळवून द्या; अजितदादांनी कंबर कसली
- शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, त्यातुन राष्ट्रवादीसोबत युती नको हाच आवाज येईल – सुधीर मुनगंटीवार